कॅपाडोसियात वर्षात 250 दिवस उडू शकतात बलुन : युनेस्कोच्या वारसास्थळांमध्ये सामील
हिमाच्छादित शिखरांनी युक्त खोऱयामध्ये सध्या हॉट एअर बलून टूर सुरू आहे. कॅपाडोसियाला जगात हॉट एअर बलूनिंगचे केंद्र मानले जाते. येथे वर्षातील 250 दिवस बलून उडू शकतात. तसेच हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील आहे. हॉट एअर बलून राइडचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात. हा प्रवास एकप्रकारे थरारक अनुभव देणारा असतो.
तेथे पर्यटक बलून राइडमध्ये सामील होऊन आकाशातून पर्वतांची रंचना आणि गुहांसोबत सूर्योदयाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. मागील वर्षी कॅपाडोसियामध्ये हॉट एअर बलून टुरमध्ये 3.9 लाख पर्यटकांनी भाग घेतला होता. बलून राइड 45 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत असते.
हॉट एअर बलून राइड तुर्कस्तानसह अन्य देशांमध्येही उपलब्ध आहे. एअर बलून टूरमध्ये आता भारत देखील सामील होत आहे. वाराणसीत देखील हॉट एअर बलून राइड होते. तुर्कस्तानसोबत टांझानियाच्या सेरेन्गेटी, नामीबियाच्या सोसुस्वेली, न्यू मेक्सिकोच्या अल्बुकुकी, इजिप्तमधल लक्जर, युटाची मोन्यूमेंट व्हॅली, म्यानमारमधील बागान, न्यूझीलंडमधील क्वीन्सटाउन, इटलीतील तुकारी, फ्रान्सची लॉयर व्हॅली, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे बलून राइडची प्रमुख केंद्रे आहेत.