वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
12 एप्रिलपासून तुर्कीमध्ये खेळविल्या जाणाऱया इंडियन बिली जीन किंग चषक सांघिक टेनिस स्पर्धेसाठी मंगळवारी अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने पाच सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. या संघामध्ये अनुभवी सानिया मिर्झा, अंकिता रैना आणि कर्मन कौर थंडी यांचा समावेश आहे.
पाच सदस्यांचा इंडियन बिली जीन किंग चषक आशिया ओसेनिया गट-1 स्पर्धेला 12 एप्रिलपासून तुर्कीतील अँटेलिया येथे पारंभ होणार आहे. भारतीय संघामध्ये ऋतुजा भोसले आणि रिया भाटिया यांचा समावेश आहे. मागील एप्रिलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत लॅटव्हियाने भारताचा 3-1 असा पराभव केला होता. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेत भारत, चीन, इंडोनेशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विशाल उप्पल करीत आहे. शालिनी ठाकुर या संघाला मार्गदर्शन करीत आहेत.