ऑनलाईन टीम / अंकारा :
तुर्कीमध्ये 20 लाख 04 हजार 285 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 17 लाख 79 हजार 068 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी या देशात 22 हजार 195 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 241 जणांचा मृत्यू झाला. सध्या 2 लाख 07 हजार 366 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 5601 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 17 हजार 851 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत तुर्की जगात सहाव्या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 2 कोटी 22 लाख 80 हजार 635 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.