31 ठार; 800 हून अधिक जखमी
ऑनलाईन टीम / अंकारा :
तुर्की आणि ग्रीस हे दोन्ही देश शक्तिशाली भूकंपाने हादरले. या भूकंपाची तीव्रता एवढी भीषण होती, की अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत 31 जण ठार झाले असून, 800 हून अधिक जखमी आहेत.
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपचा केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्येला असणाऱ्या सामोस बेटावर होता. तुर्कीच्या इजमीर शहरात, बोर्नोवा आणि बेराकली शह या भागात इमारती कोसळून मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ग्रीसमध्ये भूकंपाचे धक्के जाणवताच सुरक्षेसाठी नागरिक घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात आले. भूकंपग्रस्त भागात मदत व बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. काँक्रीट ब्लॉकमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
इजमीर हा किनारी भाग आहे. त्यामुळे ग्रीसमध्येही या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. मात्र, ग्रीसमधील जीवित अथवा वित्तहानीची माहिती समोर आली नाही.