कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या आमदार वैशाली डालमिया यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांची तृणमूल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या पश्चिम बंगालच्या बेल्ली मतदारसंघातून विधानसभेच्या सदस्य आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. पक्षामध्ये खऱया कार्यकर्त्यांना महत्त्व मिळत नसून पक्षश्रे÷ाrंच्या मर्जीतल्या लोकांना महत्त्वाची पदे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेस पक्षात प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यकर्त्यांना स्थान उरलेले नाही, हा त्यांचा आरोप आहे.