ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून कोणते राजकिय पक्ष कोणात्या राजकिय पक्षासोबत युती करणार याबाबत अद्याप काहीशी स्पष्टता नसल्याने गोवा वासीयांच्या मनात ही याबाबत उत्सूकता लागून राहीली आहे.
याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती तुटण्याबाबतची अफवा राष्ट्रीय पक्ष करत आहेत. ही बाब साफ खोटी असून. तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती कायम आहे. असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसारमाध्यांशी बोलत होते.