कोलकाता
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेसचे नेते कुंतल घोष यांना अटक केली आहे. कुंतल घोष यांनी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत 325 जणांकडून 19 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. ईडीने घोष यांची चौकशी चालविली असून कोलकाता येथील त्यांच्या घरातून अनेक दस्तऐवज हस्तगत केले आहेत. शिक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी ईडीने आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. यापूर्वी माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी आणि त्यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीला अटक करण्यात आली होती.