प्रतिनिधी/ सातारा
इच्छाशक्ती ज्यांची उदंड असते, ज्यांची स्वप्न मोठी असतात. ती माणसं ध्येय पुर्ण करण्यासाठी अपार कष्ट करतात. मेहनत घेत असतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी झटणाऱया ध्येय वेडय़ांना मार्ग निश्चित सापडत असतो. अशी ध्येयवेडी व्यक्ती साताऱयात गेल्या तीन वर्षापासून आपल्या नातेवाईकांसमवेत रहाते आहे. ती तृतीयपंथी असूनही तिला पोलीस व्हायच आहे. त्या करिता मैदानावर साताऱयाच्या मातीत सराव करते आहे. अभ्यास करते आहे. मेहनत घेत आहे. एवढय़ावर न थांबता ती राज्याच्या गृहमंत्र्यांकडेही पाठपुरावा करते आहे.
पोलीस व सैन्य दलामध्ये भरती होणं तेवढं सोपं नसतं. पोलीस दलात भरती होण्यासाठी अनेकजण मेहनत घेत असतात. अभ्यास करत असतात. साताऱयात गेल्या तीन वर्षापासून नातेवाईकांकडे राहून पोलीस भरतीचे स्वप्न पहाणाऱया सांगलीच्या तृतीय पंथी आर्या पुजारीची अशीच मेहनत डोळय़ात अंजन घालणारी अशी आहे. आर्या ही ट्रान्स जेंडर आहे. मुळची सांगली जिह्यातील आहे. 12 वी विज्ञानपर्यंतचे शिक्षण तीने शिक्षण पुर्ण केले आहे. साताऱयातल्या एका करिअर ऍकॅडमीत पोलीस भरतीचा सराव करते आहे. धावण्यांबरोबर अभ्यासामध्ये तीने लक्ष घातले आहे. तृतीय पंथींकडे आधारकार्ड, पॅनकार्ड अशी ओळखपत्र आहेत. परंतु मात्र तिच्यापुढे पेच निर्माण झाला आहे तो पोलीस भरतीचा अर्ज करताना अर्जात स्त्राr,पुरुष असे दोनच उल्लेख असल्याने तृतीय पंथी असलेल्या आर्यावर पोलीस भरती होण्याकरिता अन्याय होत आहे, असे तीने स्वतः अर्ज विनंत्याद्वारे राज्य शासनाकडे कळवले आहे. वास्तविक तृतीय पंथी म्हटलं की समाजाचा पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. टाळी वाजवून रेल्वेत, बाजारात दुकानदारांना चार दोन पैसे मागुन त्यावर गुजराण करणे, किंवा सेक्स वर्क म्हणून काही तृतीयपंथी काम करतात. परंतु पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पहाणाऱया आर्याची जिद्द पाहून अंचबित होत आहेत.