ऑनलाईन टीम/ तरुण भारत
आरजेडी चे नेते लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचा 9 डिसेंबरला विवाह झाला. हवाई सुंदरी अॅलेक्सिसशी हिच्याशी तेजस्वी यादव यांनी लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या नव्या सुनेच दुसरं नाव राजश्री ठेवलं आहे. तेजस्वी यादव यांची पत्नी आता राजश्री यादव या नावानं ओळखली जाईल. अॅलेक्सिस रचेल हिला राजश्री हे नाव लालूप्रसाद यादव कुटुंबानं दिलं आहे. तर, दुसरीकडे तेसस्वी यादव यांनी ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यानं काही नातेवाईकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. तेजस्वी यादव यांचे मामा साधू यादव यांनी तर नाराजी व्यक्त करत तेजस्वी बिहारमध्ये आल्यास बूट आणि चप्पलांनी त्यांचं स्वागत करू, असा इशारा दिलाय.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी लग्नगाठ बांधली. तेजस्वी यांनी त्यांची मैत्रीण रचेलसोबत लग्न केलंय. तेजस्वी यांच्या लग्नामुळे यादव कुटुंबीय आनंदात असले तरी त्यांचे मामा मात्र नाराज आहेत. इतके की त्यांनी तेजस्वीला कलंकही म्हटले आहे. तेजस्वी यांचे मामा साधू यादव यांना लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी तेजस्वी बिहारमध्ये आल्यास बूट आणि चप्पलांनी त्यांचं स्वागत करू, असा इशारा दिलाय.