वृत्तसंस्था/ ऍस्टेना (कजाकस्तान)
येथे सुरू असलेल्या 2023 च्या आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स भारताचा ऍथलिट तेजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले.
तेजिंदरपाल सिंगने शुक्रवारी पुरुषांच्या गोळाफेक या क्रीडा प्रकारात आपल्या तिसऱया प्रयत्नात 19.49 मीटरचा गोळफेक करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तेजिंदरपाल सिंगने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर 2019 च्या आऊट डोअर स्पर्धेत तो आशियाई विजेता ठरला होता. 2018 साली तेहरानमध्ये झालेल्या आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स स्पर्धेत तेजिंदरपाल सिंगने 19.18 मीटरचा गोळाफेक करत रौप्यपदक मिळवले होते. पुरुषांच्या गोळाफेकमध्ये कजाकस्तानमधील या स्पर्धेत भारताच्या करणवीर सिंगने 19.37 मीटरचा गोळफेक करत रौप्यपदक तर कजाकस्तानच्या इव्हानोव्हने 18.10 मीटरचे गोळाफेक करत कास्यपदक घेतले.
महिलांच्या तिहेरी उडीत भारताच्या प्रवीण चित्रावेलने रौप्यपदक पटकावले असून चीनच्या फेंग याओक्विंगने 17.20 मीटरचे अंतर नोंदवत सुवर्ण तर दक्षिण कोरियाच्या गेयुमीनने 16.73 मीटरचे अंतर नोंदवत कास्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात चित्रावेलने 16.98 मीटरचे अंतर नोंदवले. महिलांच्या पेन्थेलॉन या क्रीडा प्रकारात भारताच्या स्वप्ना बर्मनने एकूण 4119 गुण नोंदवत रौप्यपदक मिळवले. सदर स्पर्धा रविवारी संपणार आहे.