निफ्टीचा प्रवास 17,200 च्या उंचीवर : टीसीएस तेजीत
वृत्तसस्था /मुंबई
एक दिवसांच्या बुधवारच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी 514 अंकांच्या मजबूती प्राप्त केली आहे. यामध्ये प्रामुख्याने टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनलिव्हर यांच्या समभागांची स्थिती ही मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्सने 514.33 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 57,852.54 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 157.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,234.15 वर उच्चांकी कामगिरी करत बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी टीसीएसचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी लाभात राहिले आहेत. यासोबतच हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, कोटक बँक, डॉ.रेड्डीज लॅब आणि टायटनचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
प्रमुख कंपन्यांची मदत मिळत गेल्याने गुरुवारच्या सत्रात देशातील भांडवली बाजारात तेजी परतली आहे. यामध्ये औषध आणि ग्राहकोपयोगी क्षेत्रातील समभागांमध्ये तेजीचा माहोल राहिल्याने भारतीय बाजाराला मजबूती प्राप्त करण्यास यश मिळाले असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलन, रेल्वेमधून मालाची देवाणघेवाण, सेमीकंडक्टरच्या मुद्यांसह वाहन विक्रीचे आकडे, इंधनाची मागणी यांच्या प्राप्त होणाऱया आकडेवारीमधून आर्थिक स्थिती बदलत असल्याचे वातावरण निर्माण झाल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत. याचाही फायदा भारतीय बाजाराला झाला असल्याचे दिसून आले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टीसीएस…… 3837
- हिंदुस्थान युनि 2799
- अल्ट्राटेक सिमेंट 7954
- डॉ.रेड्डीज लॅब 4857
- कोटक महिंद्रा 1778
- नेस्ले………. 20205
- टायटन…….. 1964
- इंडसइंड बँक. 1010
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2293
- एनटीपीसी….. 116
- टाटा स्टील… 1425
- एचडीएफसी. 2770
- आयसीआयसीआय 725
- एचसीएल टेक 1173
- एचडीएफसी बँक 1589
- इन्फोसिस…. 1688
- ऍक्सिस बँक…. 803
- सन फार्मा…… 790
- टेक महिंद्रा… 1438
- आयटीसी……. 209
- मारुती सुझुकी 6791
- पॉवरग्रिड कॉर्प 175
- कमिन्स…….. 1041
- हॅवेल्स इंडिया 1391
- सिप्ला……….. 954
- मॅरिको……….. 562
- ज्युबिलंट फूड 4113
- वेदान्ता………. 305
- डाबर इंडिया.. 640
- अरोबिंदो फार्मा 746
समभाग घसरलेल्या कंपन्या
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 752
- बजाज ऑटो.. 3728
- बजाज फिनसर्व्ह 16715
- बजाज फायनान्स 7499
- एशियन पेन्ट्स 3300
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1685
- भारती एअरटेल 666
- स्टेट बँक……… 429
- कॅनरा बँक…… 159
- टोरंटो फार्मा. 3138
- अशोक लेलँड 121