बेकायदा रेती उपशावर कारवाई कराः उगवे ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील उगवे, तोरसे, पोरस्कडे तसेच अन्य भागात तेरेखोल नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा सुरु असून याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. बेसुमार रेती उपशामुळे दरवर्षी नदी किनारा कोसळत आहे. यामुळे किनाऱयावर असलेली शेती, बागायती नष्ट होत चालली आहे. यासंबंधी आवाज उठावूनही सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. बेकायदा रेती उपशावर बंदी घालण्यात यावी अशी तक्रार पेडणे पोलीस स्थानक, मामलेदार कार्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच पणजी पोलिसांना उगवे ग्रामस्थ उदय महाले आणि विनायक महाले यांनी सोमवार दि. 11 एप्रिल रोजी दाखल केली आहे.
ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे की, तेरेखोल नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसली जात आहे. याबाबत आम्ही वारंवार नदीपरीवहन खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे सरकारी यंत्रणा कानाडोळा करत आहे. रविवारी रात्री सुमारे 60 होडय़ा रेती उपसा करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत आम्ही पोलिसांना कळवले. रात्री 11 वा. तक्रार केल्यानंतर पोलिस व्हॅन रात्री 12.30 वा. आली आणि पाहणी केली. मात्र कुठलीच कारवाई अगर विचारणा केली नसल्याचे तक्रारीत उदय महाले यांनी म्हटले आहे. या बेकायदेशीर रेती उपसा करणाऱया कामगारांना जाब विचारल्यास ते दादागिरी करतात आणि मारायला येतात असे तक्रारदार उदय महाले म्हणाले.
बेकायदा रेती उपसाला आळा घालण्यासाठी किनारी पोलीस खास नियुक्त केले आहेत. याबाबत न्यायालयातही तक्रारी असून हा व्यवसाय कसा काय बिनधास्त सुरू आहे असा प्रश्न उदय महाले यांनी तक्रारीत केला आहे.
सरकारी अधिकाऱयांना हप्ते?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेडणे पोलीस, किनारी पोलीस, पेडणे तालुक्मयाचे दोन सरकारी अधिकारी यांना रेती उपसा करणाऱया होडी मालकाकडून प्रत्येक महिन्याला सुमारे 15 हजार रुपये हप्ता दिला जातो. तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करणाऱया शेकडो होडय़ा असून महिन्याकाठी लाखो रुपये हे सरकारी अधिकारी गोळा करतात. त्यामुळे हा व्यवासाय मोठय़ा दिमाखात सरकारी अधिकाऱयांच्या आशीर्वादामुळे सुरू आहे.
अधिकारी रेती माफियाच्या हातचे बाहुले
कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार पेडणेत सुरू असून याचा प्रत्यय किनारी पोलिसांच्या भूमिकेवरुन दिसून येत आहे. नदीचे संरक्षण करण्यासाठी खास नियुक्त केलेले हे किनारी पोलीसच महिनाकाठी लाखो रुपये हप्ता घेऊन या रेती उपसा व्यवसायाला संरक्षण देत आहेत. ऐरवी सरकारी यंत्रणा एखाद्या गरीब व्यक्तीने बेकायदा कृती केली तर गांभीर्याने लक्ष देते. मात्र लाखो रूपयांचे हाप्ते घेणाऱया रेती माफियांकडे डोळे झाक होत आहे. सरकारी यंत्रणाच रेती माफियाच्या हातचे बाहुले बानली आहे.
आमदार आर्लेकर यांनी लक्ष देण्याची मागणी
पेडणेतील तेरेखोल नदीपात्रात होणाऱया बेकायदेशीर रेती उपशामुळे किनाऱयावरील शेती, बागायती नष्ट होत असून लोकांचे मोठे नुकसान होत आहे. बेकायदा रेती उपसा व्यवसायात जे गुंतले आहेत तसेच जे आधिकारी महिन्याला लाखो रुपाये हप्ता घेऊन या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत याकडे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याभागातील लोकांकडून केली जात आहे.