तेलाच्या किमती युद्धाच्या परिणामः अनुमानाची नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरबमधील सुरु असलेले कच्च्या तेला संदर्भातील किमतीचे युद्ध याचा भारताला काही प्रमाणात फायदा होणार असल्याचे संकेत आहेत. कारण कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात झाल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. देशातील तेल आयात खर्च 2020-21 मध्ये घटून 64 अब्ज डॉलरवर येण्याचे अनुमान नोंदवण्यात आले आहे. ही तुलना 2018-19 मध्ये 112 अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर कमी होण्याचा अंदाज मांडला आहे.
कोरोनाची धास्ती आणि किंमत युद्धाचा प्रभाव
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग सध्या मोठय़ा प्रमाणात जगातील व्यापार उद्यागोवर प्रभाव पाडत आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे तेल निर्यात देशांची संघटना ओपेक आणि रशियाच्या जवळपास होत असणारे तेल उत्पादनात घट करण्यावर सहमती न झाल्याने किमतीचे युद्ध सुरु झाले आहे. यात सौदी अरेबियाने तेल उत्पादन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या कारणामुळे तेलाच्या किमती मोठी घसरण नोंदवली आहे. 30 डिसेंबरला ब्रेंट प्रुड ची किंमत जवळपास 70 डॉलर प्रति बॅरेलवर व्यवहार करण्यात आला होता. सोमवारी दिवसभरातील व्यवरामध्ये कच्च्या तेलाची किंमत 31.82 टक्क्यांनी घसरुन 31.02 डॉलर प्रति बॅरेलने खालची पातळी गाठली होती. चालू व्यापारी वर्षात 2019-20 मध्ये देशातील तेल आयात खर्च 10 टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तेलाच्या आयात खर्चाचा नवा विक्रम?
2020 मधील सध्याच्या किमतीनुसार कच्च्या तेलाची किंमत जास्तित जास्त 30 डॉलर प्रति बॅरेल राहू शकते. त्यामुळे देशातील तेल आयातीच्या खर्चात घट होत अनेक वर्षांची खालची पातळी हा दर गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अंदाज लक्षात घेत तेल आयात खर्च 2020-21 मध्ये घटत जात 64 अब्ज डॉलरवर येण्याचा संकेत आहे. जो खर्च 2015-16 मध्ये तेल किंमत घटून 26 डॉलर प्रति बॅरेलच्या खाली आली होती.
देशाच्या खर्चात होणार बचत?
तेलाची किंमत जर का एक डॉलरने घटली तर तेल आयातीच्या खर्चात जवळपास 2,900 कोटी रुपयांनी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत हा भाव 100 पैशानी घसरतो तेव्हा तेल आयातीचा खर्च 2,700 कोटी रुपयांनी वाढला जातो. तेल बाजारातील एक अभ्यासकांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या संर्सगामुळे चालू वर्षात तेल आयात खर्च घटून 100 अब्ज डॉलरच्या खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण सध्याच्या तेलाच्या किमतीचे युद्ध सुरु झाल्यामुळे हा तेल आयात खर्च कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.