वृत्तसंस्था/मुंबई
जगातील प्रत्येक देश रिन्यूएबल एनर्जीवर लक्ष केंद्रीत करीत आहेत. यामध्ये गरीब परंतु संसाधन संपन्न देशही आहेत. कार्बन ट्रकरच्या माहितीनुसार सर्वात प्रभावशाली देशांमध्ये 40 कोटीपेक्षा अधिक लोक वास्तव्य करीत आहेत. याच देशामध्ये इंधन कमाईमध्ये सरकारी उत्पन्न 20 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहे. याच कारणामुळे नागरिकांना मिळणाऱया साधारण सेवांमध्ये कपात होण्याचे संकेत आहेत.
विश्लेकांच्या माहितीनुसार सात देशांना 2040 पर्यंत एकूण सरकारी कमाईतून कमीत कमी 40 टक्के नुकसान होण्याचे संकेत आहेत. अभ्यासकांच्या माहितीनुसार नायजेरिया, अल्जेरिया, सौदी अरब, कुवैत आणि इराक या अशा 12 देशांमध्ये सरकारी कमाईमध्ये 20 ते 40 टक्के घट राहणार असल्याची माहिती आहे. रशिया, मॅक्सिको आणि इराण यांना 10 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान नुकसान राहण्याचे संकेत आहेत.
स्वस्त होत आहे रिन्यूएबल एनर्जी
हवा आणि सौर ऊर्जा यासारख्या रिन्यूएबल एनर्जी, फॉसिल फ्यूलच्या तुलनेत स्वस्त होत आहे. फॉसिल फ्यूल याचा अर्थ आहे, गॅस, तेल कोळसा या सारख्या नैसर्गिक संसाधनाद्वारे तयार होणारे इंधन होय. यासारख्या ऊर्जा निर्मितीमुळे तेल उत्पादक देशांच्या उद्योगांना अंदाजे वर्ष 2040 पर्यंत 13 लाख डॉलरपर्यंत नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
चीन-जपानने दिले रिन्यूएबल एनर्जीसाठी प्रोत्साहन
कार्बन ट्रकरमध्ये जलवायु, ऊर्जा आणि उद्योगाचे प्रमुख ऍण्डय़ू ग्रांट यांनी म्हटले आहे, की चीन आणि जपान यासारख्या जागतिक पॉवर हाऊस देशांनी शुन्य प्रदूषणाची घोषणा केली आहे. याअंतर्गत परंपरागत ऊर्जा वापर कमीत कमी करुन नैसर्गिक ऊर्जा साधनांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विशेष पॅकेज देण्यासाठीही प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.