16 दुभती जनावरे मृत्युमुखी : पशुसंगोपन खात्याचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारपेठ येथील पिराजी रामजी गवळी या गवळी कुटुंबीयांची तब्बल 16 दुभती जनावरे अज्ञात रोगाने दगावल्याने गवळी कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी पाठपुरावा करून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप गवळी कुटुंबीयांना भरपाई न मिळाल्याने कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहे.
एप्रिल महिन्यात अज्ञात रोगाची लागण होऊन म्हशी मृत्युमुखी पडत गेल्या. दरम्यान, पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱयांना प्रारंभी कोणता आजार झाला हे समजले नाही. आजाराची लागण होऊन म्हशी मृत्युमुखी पडत गेल्या. आणि या कुटुंबीयांच्या गोठय़ातील तब्बल 16 म्हशी मृत झाल्या. काही दिवसांच्या अंतराने म्हशी दगावत गेल्याने कुटुंबीयांचा गोठा खाली झाला आहे. सध्या गोठय़ातील इतर जनावरेदेखील आजारी असल्याने या कुटुंबीयांसमोर चिंता वाढली आहे.
जातीवंत दुभत्या म्हशींचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जातीवंत म्हशींची किंमत बाजारभावाप्रमाणे 80 हजार ते 1 लाखापर्यंत आहे. या गवळी कुटुंबीयांच्या 16 म्हशी दगावल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, दगावलेल्या म्हशींचा पंचनामा पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱयांनी केला होता. शिवाय रोगाचे निदान करण्यासाठी बेंगळूर येथून पथक बोलाविले होते. दगावलेल्या जनावरांना ‘मॅलिगंट कटरल फिव्हर’ आजार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. गोठय़ातील सर्वच जनावरे रोगाची शिकार झाल्याने या कुटुंबीयांचा गोठा खाली झाला आहे. पशुसंगोपन खात्याने तातडीने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.