ऑनलाईन टीम / तायपे :
पूर्व तैवानमध्ये रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 36 प्रवाशी ठार झाले आहेत. तर 72 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बचावकार्याला वेग आला आहे. तैवानच्या परिवहन मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
अपघातग्रस्त रेल्वेतून 350 प्रवाशी प्रवास करत होते. पूर्व तैवानमधील तोरोक जॉर्ज परिसरात सकाळी 9 वाजता ही रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला. यात 36 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 72 जण जखमी आहेत. त्यामधील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.