सातारा : जिल्ह्यात ‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. जावली तालुक्यात 9 घरांची पडझड झाली आहे. कोरेगाव तालुक्यात एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे. कराड तालुक्यात 7 घरांची पडझड, 2 जनावरांच्या गोठ्यांचे, एका पोल्ट्री शेडचे आणि एका शाळेचे नुकसान झाले आहे.
पाटण तालुक्यात 10 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यात 22 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 3 शासकीय इमारतींचे अशंत नुकसान झाले असून 18 विद्युत पोल पडले आहेत. वाई तालुक्यात 7 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. एका शाळेचे नुकसान झाले असून 10 विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, फळबागाचे नुकसान झाले आहे. खंडाळा तालुक्यात विद्युत पोलचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.