वार्ताहर/ जमखंडी
लोकायुक्त खात्यात अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करीत असलेल्या तोतयाला जमखंडी पोलिसांनी अटक केली. अप्पू ऊर्फ अप्पय्या बसय्या हिरेमठ (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या भामटय़ाचे नाव आहे. हिरेमठ याने यापूर्वी शिमोगा, हुक्केरी, हिडकल अशा अनेक ठिकाणी त्याने भेट देऊन फसवणूक केली असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी, विविध खात्यातील अधिकाऱयांचा मोबाईल नंबर मिळवून हिरेमठ हा त्यांना फोनवर संपर्क करत असत. त्यानंतर अधिकाऱयांची भेट घेऊन आपण लोकायुक्त खात्यात अधिकारी असल्याचे सांगत असे. यांनतर अधिकारी व कर्मचाऱयांना धमकावून त्यांची फसवणूक करीत असे. अधिकारी व कर्मचाऱयांकडून उकळलेल्या पैशातून तो चैन करीत असल्याचे समजते.
दरम्यान जमखंडी येथील देसाई सर्कलनजीकच्या रमा निवास शासकीय विश्रामगृहात हिरेमठ हा आला होता. यावेळी येथील कर्मचाऱयांना लोकायुक्त खात्यातील वरि÷ अधिकाऱयांनी आपल्याला पाठविले आहे. रमा निवासमध्ये आपल्याला खोली हवी असून ती द्यावी, असे सांगितले. यावेळी तेथील अधिकाऱयांना त्याच्या वर्तवणुकीचा संशय आला. यानंतर नजीकच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हिरेमठ हा तोतया अधिकारी असल्याचे उघडकीस आले. पीएसआय गोविंदगौड पाटील यांनी संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत करून अधिक चौकशी सुरू केली. पोलीस कारवाईत शिवानंद राठोड, मल्लू कोलार, राजशेखर मनगोळी, शेगुणशी आदी पोलिसांनी सहभाग घेतला.