ऑनलाईन टीम / नंदुरबार :
धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप मोठ्या दरीत कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या जीपमध्ये आणखी मजूर असण्याची वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास झाला. या अपघातात 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जीप मोठ्या दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असतांना हा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.