प्रतिनिधी/अक्कलकोट
तोळणूर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ९७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ९ जणांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. त्यामध्ये जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल व मोटार सायकल जप्त केली आहे.
आणाप्पा रामंचद शिवमुर्ती ( वय ४५ ), देवेंद्र चंदप्पा हरळय्या ( वय ४९ ), राजशेखर भिमशा रामतिर्थ ( वय ३५), चंद्रशेखर सुभाष व्हरकेरी ( वय ४० ), विजकुमार भिमाशंकर व्हरकेरी ( वय ४५ ) भिमराव काशिनाथ राठोड ( वय ४० ), गुरप्पा बसवराज मडनळी ( वय ३६ ), सोमनाथ शिवप्पा नरुने ( वय ३२, सर्व रा. तोळणूर ), राम व्यकंप्पा अलमेल ( वय ३५ रा.माशाळ ता.अफजलपूर ) अशी नऊ आरोपींची नावे आहेत. तर आणाप्पा शियमुर्ती हा जुगार चालवित अड्ड्या असल्याचे सांगितले.
अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता पोलीस पेट्रोलींग करीत तोळणूर येथे गेले होते. गावातील सिध्देश्वर मंदीराच्या आडोशास पाठीमागील बाजूस लिंबाच्या झाडाखाली गोलाकार बसून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते. तशी खाञी झाल्याने पोलीस पथक पायी चालत सिध्देश्वर मंदीरा जवळ आले. तेथे मंदिराच्या पाठीमागे काही लोक गोलाकार बसून ५२ पान्याचे पत्यावर जुगार खेळत असल्याचे दिसल्याने त्यांना गराडा घालून जागीच पकडले. जुगार अड्ड्याचा चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक भाऊकांत कृष्णांत सरवदे यांनी याप्रकरणी मंगळवारी दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.