वीजखांब पूर्ववत केल्याने शेतकऱयांना मिळाला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
बेकिनकेरे-गोजगा मार्गावर बेकिनकेरे शिवारात वीजखांब कलंडल्याने शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध होताच हेस्कॉम खडबडून जागे झाले. आणि खांब तातडीने दुरुस्ती केला. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे बेकिनकेरे-गोजगा मार्गावर वीजखांब कलंडला होता. त्यामुळे शिवारात काम करणाऱया शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर हेस्कॉमने याची दखल घेऊन कलंडलेला वीजखांब पूर्ववत उभा केल्याने शेतकरीवर्गातून समाधान क्यक्त करण्यात येत आहे.
शिवारात सध्या भांगलणीच्या कामासाठी महिलावर्गाची वर्दळ वाढली आहे. त्यातच पावसामुळे सगळीकडे हिरवे गवत वाढले आहे. त्यामुळे कलंडलेल्या वीजखांबामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता होती. हेस्कॉमने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजखांब पूर्ववत उभा केला. त्यामुळे शेतकऱयांची चिंता मिटली आहे.
बेकिनकेरे-गोजगा मार्गावर वीजखांब पूर्णपणे एका बाजूला कलंडला होता. दरम्यान, या मार्गावरून होणाऱया वाहतुकीला हा खांब धोकादायक ठरत होता. सतत वर्दळ असणाऱया मार्गावरील कलंडलेला वीजखांब पूर्ववत उभा केल्याने शेतकरीवर्गातून समाधानाचा सूर निघत आहे.