सीईओ विशाल गर्ग पुन्हा रुजूः झूम कॉलवर 900 जणांना पाठविले होते घरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेरिकन कंपनी बेटरडॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मागील काही दिवसांपूर्वी एका झूम कॉलवर जवळपास 900 कर्मचाऱयांना घरी पाठविले होते. यामुळे ते चर्चेत राहिले होते. परंतु तेच पुन्हा एकदा आपली धुरा सांभाळणार असल्याचे संकेत आहेत. ते दीर्घ सुट्टीवर गेले होते. त्यांच्या येण्याने नव्याने चर्चाना उधाण आले असल्याचे दिसून येत आहे.
कंपनीने एका मेलच्या मदतीने सांगितले होते, की बेटरडॉटकॉमचे सीईओ विशाल गर्ग हे दीर्घ कालावधीसाठी रजेवर जात आहेत. परंतु यामध्ये ते पुन्हा सीईओ म्हणून परतणार असल्याचेही म्हटले होते. तसेच विशालवर आमचा विश्वास असल्याचेही यावेळी म्हटले होते.
वर्ष 2016 मध्ये बेटरडॉटकॉमची स्थापना करण्यासाठी विशाल गर्ग यांनी जेव्हा झूम कॉलच्या आधारे 900 जणांना नोकरीवरुन काढून टाकणार असल्याची घोषणा केली होती. परंतु तेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत विशाल यांनी माफीही मागितली होती.