फेसबुक नेटवर्क प्रभावाचा परिणाम : एका दिवसात जोडले 7 कोटी ग्राहक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पाच ऑक्टोबरची रात्र ही टेलीग्रामसाठी ऐतिहासिक क्षण नेंदवणारी ठरली आहे. याच दिवशी या ऍपने तब्बल 7 कोटी ग्राहक जोडले आहेत. टेलीग्रामची ही सर्वात मोठी कामगिरी राहिली आहे. फेसबुकचे नेटवर्क सोमवारी रात्री प्रभावीत झाल्याचा फायदा टेलीग्रामला झाल्याची माहिती आहे.
साधारणपणे सोमवारी रात्री 6 तासाच्यावर फेसबुकसह व्हॉटसऍप व इंस्टाग्रामची सेवा संपूर्णपणे ठप्प झाली होती. हे प्लॅटफॉर्म बंद झाल्याचा फायदा हा टेलीग्रामला मिळाल्याचे दिसून आले असून टेलीग्रामची महिन्यातील ऍक्टीव्ह ग्राहकांची संख्या ही 50 कोटीच्या घरात पोहोचली आहे.
आमच्याकडे वेलकमंच आहे : सीईओ
फेसबुकची सेवा खंडित झाल्याच्या दरम्यान टेलीग्रामने मोठय़ा प्रमाणात नवीन ग्राहकांची जोडणी केली आहे. टेलीग्रामची दररोजची वाढ ही नेहमीपेक्षा अधिक झाली असून आम्ही अन्य प्लॅटफॉर्मच्या आधारे 7 कोटीपेक्षा अधिकच्या ग्राहकांचे वेलकम केले असल्याचेही टेलीग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांनी स्पष्ट केले आहे.
टेलीग्रामचे विशेष फिचर्स सर्व प्रकारचे चॅट करता येणारे ऍप म्हणून टेलीग्रामची ओळख आहे. टेलीग्राममध्ये पेमेन्ट बॉट 2017 पासून उपलब्ध आहे. हे ग्राहकांना सुरक्षित स्वरुपात पेमेन्ट करण्याची मान्यता देते. आता व्यापाऱयांना कोणत्याही चॅटवर पेडिट कार्डच्या आधारे पेमेन्ट ऍक्सेप्ट (रक्कम स्वीकारणे)करता येणार आहे. पेमेन्ट आता कोणत्याही ऍपमधून करता येण्याची सुविधा आहे.