मालवण / प्रतिनिधी-
तौक्ते’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पाहणी पथक रविवार ६ जून रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. देवगड तालुक्यातून दौऱ्यास प्रारंभ होणार आहे. कुणकेश्वर येथे जिल्हा प्रशासनासमवेत केंद्रीय पथकाची बैठक होणार असल्याचे समजते.