सुळे / वार्ताहर
पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ गावातील एका मंडळाच्या अध्यक्षाला आठ दिवसापासून ताप. कणखण जाणवत होती. गावातील दोन स्थानिक डॉक्टराकडे तपासणी करून औषधे उपचार घेतले. पण ताप काही कमी आला नाही. यामुळे कोरोनाच्या भीतीने तो गावातील मित्राला व भाड्याची चारचाकी गाडी घेऊन तिघे कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी सी.टी.स्कॅन केल्यानंतर व पेशंटची अवस्था बघितल्यावर हि कोरोनाची लक्षणे असल्यांचे सांगितले. व याची माहीती प्रशासनास देऊन रूग्ण व सोबत आलेल्या दोघांचे स्वॅब घेऊन त्यांची रवानगी थेट पन्हाळा येथील कोवीड सेंटरमध्ये केली.
या रुग्णाला कोरोना झाला असल्याची पोस्ट व्हाटस्अप गुपवर व्हायरल झाली, यामुळे गावात पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावासह आसपासच्या गावात खळबळ उडाली.सदरच्या रुग्णांचा जनसंपर्क मोठा असल्याने तो अनेकाच्या थेट संपर्कात आला होता. यामुळे गावातील अनेक लोकांनी याची धास्ती घेतली. मल्हारपेठ व सावर्डे गावातील काही जण शाळेत तर काही जण घरीच क्वारंटाईन झाले.
तीन दिवसानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता या तिघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. अन् गावाने सुटकेचा निश्वास सोडला. यामुळे संपूर्ण गावालाच आनंद झाला. त्याच्या कार्यकत्यांचा आनंद तर गगनात मावेनाशा झाला. त्यांनी स्वःता पैसे काढले. व चौकात फटाक्यांच्या माळा लावून अतिषबाजी करुन दिवाळीच साजरी केली. सुमारे अर्धा तास हि फटाकेबाजी चालु होती. या फटाक्यांची आवाजाचा धुर भागात सर्वदूर पसरला. व परिसरात याचीजोरदार चर्चा रंगली,