अजित पवारांच्या सत्कारासाठी आणलेल्या पुस्तकाला प्लॉस्टिकचे आवरण
ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज मराठवाडा नियोजन विभागाची बैठक सुरु आहे. आठही जिह्यांचा ते आढावा घेत आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक सुरु आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तकाची भेट आणलेल्या नियोजन विभागाच्या उपायुक्तांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंदेकर यांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक मागविले होते. पुस्तकाला प्लॉस्टिकचे आवरण असल्याने महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडय़े यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. याबद्दल विभागाचे उपायुक्त रवी जगताप यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.