प्रतिनिधी/ बेळगाव
हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची बेंगळूर येथे विटंबना झाल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला. या घटनेचे पडसाद शनिवारी दिवसभर बेळगाव तसेच आसपासच्या परिसरात दिसून आले. प्रत्येक ठिकाणी असणाऱया शिवमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर शहरातील शिवाजी उद्यान येथील मूर्तीचेही पूजन करण्यात आले. शिवाजी उद्यान येथे जमण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे शिवभक्त व पोलिसांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. जोवर त्या माथेफिरूवर कारवाई होत नाही तोवर आपण शांत बसणार नाही असा पवित्रा शिवभक्तांनी घेतला.
विविध संघटनांचे पदाधिकारी शिवाजी उद्यान परिसरात येत होते. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोठय़ा संख्येने शिवाजी उद्यान परिसरात युवक जमले होते. परंतु त्यांना उद्यानात जावू न दिल्याने ते जिल्हाधिकारी कार्यालयावर चालत निघाले. परंतु पोलिसांनी त्यांना कपिलेश्वर उड्डाण पुलावर अडविले. शहरात जमावबंदीचा आदेश असताना अशी गर्दी करून मोर्चा काढता येणार नाही, असे सांगून तरुणांना तेथेच थांबविले.
शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधीवतपणे पूजन करण्यात आले. 144 कलम लागू असल्याने काही मोजक्मयाच कार्यकर्त्यांना उद्यानात प्रवेश देण्यात आला. काही कार्यकर्त्यांसोबत पोलिसांची बाचाबाची झाली. यामुळे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, हिरामणी मुचंडीकर, पुंडलिक चव्हाण, कल्लप्पा पाटील, सागर मुतकेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्यासह शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवप्रति÷ानच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले होते. जोवर कार्यकर्त्यांची सुटका होणार नाही तोवर उद्यानासमोरून हलणार नाही, अशी भूमिका किरण गावडे यांनी घेतली. यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांची सुटका करावी लागली. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. परंतु पोलिसांमुळे त्यांना दूरच थांबावे लागले. बेंगळूर येथे झालेल्या शिवपुतळय़ाचा अवमान तसेच चित्रदुर्ग येथे भगवा ध्वजाचा केलेला अवमान या दोन्ही घटनांचा तीव्र शब्दात शिवप्रति÷ानतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना–समितीच्या पदाधिकाऱयांची अडवणूक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी आलेल्या शिवसेना तसेच म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांची पोलिसांनी अडवणूक केली. विनंती करूनही त्यांना उद्यानात प्रवेश देण्यात आला नाही. यामुळे पोलीस व पदाधिकाऱयांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. संतप्त झालेल्या पदाधिकाऱयांनी उद्यानासमोरच ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसैनिक महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे यांना तेथून हटविले. पदाधिकारी ऐकण्यास तयार नसल्याने अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहापूर पोलीस स्थानकात घेऊन जाऊन त्यांची सुटका करण्यात आली.
बंधने झुगारून महिलांकडून शिवमूर्तीला अभिषेक
शिवाजी उद्यानमधील शिवमूर्तीचे पूजन करण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. त्यामुळे येणारे कार्यकर्ते असो वा विविध संघटनांचे पदाधिकारी त्यांना दुरूनच हुसकावून लावले जात होते. परंतु ही बंधने झुगारत म. ए. समितीच्या महिला पदाधिकाऱयांनी शिवमूर्तीला दुग्धाभिषेक केलाच. आम्ही येथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ करण्यासाठी आलो नसून फक्त महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी आलो आहोत हे महिला आघाडीच्या रेणु किल्लेकर यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले. यामुळे पोलिसांना माघार घेत त्यांना उद्यानात सोडावे लागले.
माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रेणु मोरे यांच्यासह इतर महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत दुग्धाभिषेक केला. यामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. महिलांनी दुग्धाभिषेक करताच शिवाजी उद्यान परिसरात असलेल्या तरुणांनी एकच जयघोष सुरू केला.
किरण जाधव यांच्याकडून शिवमूर्तीचे पूजन
मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीचे पूजन केले. त्यांनाही पोलिसांनी प्रवेशद्वारावर अडविले होते. परंतु किरण जाधव यांनी आपणाला दर्शन घेण्यास कोणीही अडवू शकत नाही असा पवित्रा घेताच पोलिसांना त्यांना आत सोडावे लागले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मी प्रथमतः एक मराठा आहे त्यामुळे बेंगळूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करणे ही माजी जबाबदारी आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या सोबत शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव, जे. बी. शहापूरकर, रवि निर्मलकर, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
नगरसेवक रवी साळुखे यांनी सुद्धा शिवाजी उद्यानात जाऊन शिवमूर्तीचे पूजन केले.
कार्यकर्त्यांवर पोलिसांची दादागिरी
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि देशभरातून संतापाची लाट उसळली. याचे पडसाद शनिवारी पहायला मिळाले. संतप्त झालेले कार्यकर्ते शिवाजी उद्यान येथे जमत होते. परंतु पोलिसांकडून त्यांच्यावर दादागिरी केली जात होती. बऱयाच तरुणांना पोलिसांनी विनाकारण ताब्यातही घेतले. पोलिसांच्या या दादागिरीमुळे तरुणांमधून संताप व्यक्त केला जात होता.
शिवाजी उद्यान परिसरात हजारोच्या संख्येने युवकांची उपस्थिती
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान झाल्याने शनिवारी सकाळी शिवाजी उद्यान परिसरात मोठय़ा संख्येने तरुण जमा होत होते. एकाचवेळी तरुण जमा झाल्यास पोलिसांकडून त्यांना हटकले जात होते. यामुळे थोडय़ा थोडय़ा संख्येने बँक ऑफ इंडिया कॉर्नर, शास्त्रीनगर या परिसरात तरुण जमा झाले होते. गर्दी रोखण्यासाठी पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले होते.