अमोल फुलारी / अक्कलकोट
कोविडच्या अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा एक-दोन रुग्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यावेळी अनेक आजारांचे स्पेशालिस्ट म्हणवणाऱ्या कागदी डिग्रीबाज डॉक्टरांनी आपली दुकानदारी बंद ठेऊन त्यावेळेस इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्या अनेक गंभिर रुग्णांकडे दुर्लक्षीत करत त्यांना अॅडमीट करून न घेता हॉस्पीटलच्या बाहेरूनचं रुग्णाला परत पाठवत आपला धर्म विसरला. त्याच काळात डॉ शिवराज संगशेट्टी यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत येणाऱ्या अनेक रुग्णांना उपचार दिले.
दि २० सप्टेंबर रोजी सायंकाळी १० च्या सुमारास वागदरी ता अक्कलकोट येथील रहिवासी व सध्या पश्चिम बंगाल येथे देशसेवा करणारे सैनिक भीमाशंकर भैरामडगी यांचा ४ वर्षाचा मुलगा गिरीराज भयानक तापाने फणफणत होता. ताप इतका चढला की बाळ अक्षरशः झटके देऊ लागला. तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले. गाडी अक्कलकोटकडे निघाली. रस्त्यात शिरवळवाडी लागते आणि त्याच गावात बालरोगतज्ज्ञ डॉ शिवराज संगशेट्टी असल्याने त्यांना दाखवण्यासाठी गाडी थांबली. मर्यादेपेक्षा ताप जास्त असल्याचे दिसून आले. बाळाच्या आईची प्रसूती झाल्याने त्या घरी होत्या. बाळ गिरीराज वडील व काका सोबत असल्याने या लोकांनी डॉ संगशेट्टी यांना विनंती केल्याने कशाचाही विचार न करता आहे. त्या नाईट ड्रेसवर १०८ मध्ये बसले. अक्कलकोट येथील डॉ दीपक पाटील यांच्या दवाखान्यात जागा उपलब्ध करून घेऊन स्वतः प्राथमिक उपचार दिले त्यात ३०% झटके कमी झाले.
त्यानंतर बाळाला घेऊन सोलापूर येथील डॉ महेश अरकल यांच्याकडे दाखल केले. विषाणूजन्य मेंदूज्वर या आजाराने चार वर्षाचा गिरीराज १२ तास कोम्यात होता. आता तो एकदम ठणठणीत बरा असून सुस्थितीत आहे. रुग्णाला योग्य वैद्यकीय निदान भेटणे हे रुग्णासाठी क्रमप्राप्त असते आणि हेच काम डॉ शिवराज संगशेट्टी यांनी केले आहे. म्हणून आज हे बाळ वाचले. डॉ संगशेट्टी हे यापूर्वी मार्कंडेय रुग्णालय सोलापूर येथे आठ वर्ष, सांगोला येथे दोन वर्ष आणि अक्कलकोट तालुक्यातील वागदरी या ठिकाणी तीन वर्ष रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांच्या पत्नी श्रुती बताले- संगशेट्टी यांनी सुद्धा त्यांच्या कामात हातभार लावत आहेत. दि २९ रोजी वागदरी येथील विठ्ठल भैरामडगी परिवाराकडून कृतज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आले.
जीव वाचवणे हे सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि मी माझे कर्तव्य व जबाबदारी म्हणून हे कार्य केले आहे. ४ वर्षाच्या बाळाला योग्य वैद्यकीय निदान वेळेत मिळाल्यामुळे हे सर्व साध्य झाले. – डॉ शिवराज संगशेट्टी बालरोगतज्ज्ञ वागदारी ता अक्कलकोट
आमच्या बाळाचे प्राण डॉ शिवराज संगशेट्टी यांनीच वाचवले.त्या रात्री ते जर आम्हाला भेटले नसते तर खूप मोठे संकट आमच्या कुटूंबावर ओढवले असते. गिरीराज साठी डॉ संगशेट्टी देवदूतच ठरले आणि हे उपकार आम्ही शेवटपर्यंत विसरणार नाही. – भिमाशंकर भैरमडगी – भारतीय सैनिक (बाळाचे वडील )