ऑनलाईन टीम/तरुण भारत
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी साक्ष नोंदवली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या प्रकरणात शरद पवार यांनी सरकारच्या चौकशी आयोगासमोर आपली साक्ष नोंदवली आहे. यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आले होते. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यामध्ये पवारांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
यासंदर्भात शरद पवार यांना २३ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. शरद पवार यांनीही एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यामध्ये पवारांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शरद पवारांनी आज चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवली आहे.
शरद पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाबद्दल देखील माहिती दिली होती. त्यामुळे पवारांचा जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी चौकशी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पवारांना समन्स बजावण्यात आले. पवारांनी आज आयोगासमोर हजर राहून त्यांची साक्ष नोंदवली आहे. पवारांसोबतच पुण्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.