अनेकज्ण डिचोली पोलिसाच्या संपर्कात : पोलीस खऱया माता-पित्याच्या शोधात : बालिका अजूनही गोमेकॉत.
प्रतिनिधी / डिचोली
खऱया माता-पित्यांनी जरी जन्मताच रस्त्यावर सोडून दिले असले तरी ‘त्या’ नवजात बालिकेला दत्तक घेण्यासाठी अनेक पालक सरसावले आहेत. डिचोली पोलिसांकडे सध्या सदर प्रकरण असल्याने अनेक इच्छुकांनी पोलिसांकडे संपर्क साधला आहे; मात्र बालक दत्तक देण्याचे सर्वाधिकार ‘अपना घरा’ला असल्याने पोलीस याबाबत काहीच करू शकत नाहीत. दरम्यान पोलिसांनी संबंधित बालिकेच्या खऱया मातापित्याचा यद्धपातळीवर शोध घेत आहेत.
गोकुळवाडी सांखळी येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या लोकवस्तीत सोमवारी सकाळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. जन्म होताच अवघ्या दोन तांसातच त्या नवजात बालिकेला प्लास्टिक पिशवीत लपेटून रस्त्याच्या बाजूला सोडण्यात आले होते. कचऱयाची पिशवी म्हणून अनेकांनी प्रथमदर्शनी दुर्लक्षच केले. मात्र सदर पिशवीतून बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती देत पिशवी खोलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी नंतर सदर पिशवी पूर्णपणे खोलत बालिकेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या बालिकेची रवानगी प्रथम आरोग्य केंद्रात व नंतर गोमेकॉत करण्यात आली होती. सदर बालिकेच वजन कमी असल्याने तिच्यावर विशेष उपचार सुरू आहे. पण तिची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली. या प्रकारानंतर डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱयांनी गर्भवती असलेल्या महिलांची यादी, तसेच या महिन्यात किंवा काळात प्रसुती होणार असलेल्या महिलांची यादी मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र रात्रीपर्यंत काहीच हाती लागले नव्हते. तसेच मंगळ. दि. 6 एप्रिल रोजीही या प्रकरणी पोलिसांनी शोधकार्य सुरूच होते.
माणुसकीला फुटला पाझर
विवाह झाल्यानंतर दाम्पत्याच्या संसाररूपी झाडाला अपत्याच्या स्वरुपात फूल फुलावे अशी अपेक्षा असते. त्याचे महत्त्व आहे संबंधित जोडपेच जाणते. आज या समाजात अनेक अशीही जोडपी आहे की ज्यांच्या पोटी दुर्दैवाने मूलच जन्मालाच आले नाही. अशा जोडप्यांना आज अशा मुलांचे महत्त्व काय याची पूर्ण जाणीव असते. सोमवारी साखळीत घडलेल्या या प्रकारामुळे प्रत्येकाचे मन हेलावले. त्या नवजात बालिकेला आपल्या अंगाखांद्यावर घेण्यासाठी अनेक पालकही पुढे सरसावले. या घटनेद्वारे पोटच्या गोळय़ाला रस्त्याच्या बाजूला सोडणारे निर्दयी पालक दिसून आले, तर दुसऱया बाजूने सदर बालिकेला आपले वात्सल्य देण्यासाठी अनेक जणांमध्ये माणुसकीचा पाझर फुटल्याचे पहायला मिळाला.
दरम्यान, नवजात अर्भक ही मुलगी असल्यानेच तिला अशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला ठेवले असल्याचा संशय याठिकाणी व्यक्त केला आहे. आजच्या या समानतेच्या जमान्यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणारे महाभागही आहेत, याची प्रचिती येते. हे अर्भक बिगरगोमंतकीय कुटुंबियातीलच असाव्sढ, असाही अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच संबंधित महिलेची प्रसूती कोणत्याही इस्पितळात न होता कुठेतरी घरात अथवा अन्य कुठेतरी झाली असावी, असाही अंदाज बांधण्यात येत आहे. सरकारी यंत्रणांकडून या गोष्टींवर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
दत्तक देण्याचे सर्वाधिकार ‘अपना घरा’ला
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे असला तरी, त्या बालिकेला दत्तक देण्याची प्रक्रिया पोलिसांच्या अखत्यारित नाही. अशा बालकांना दत्तक देण्याचे सर्वाधिकार हे अपना घरकडे आहेत. सध्या पोलीस नवजात बालिकेच्या खऱया माता-पित्याच्या शोध घेत आहेत. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास डिचोली पोलिसांशी संपर्क साधून कोणतीही भीती मनात न बाळगता माहिती द्यावी. माहिती देणाऱयांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी केले आहे.