बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले की, भाजप नेते रमेश जारकिहोळी यांच्यासह लैंगिक गैरव्यवहारात सामील असलेल्या महिलेची भेट घेतली नसल्याचे म्हंटले आहे.
शुक्रवारी झालेल्या लीक ऑडिओ संभाषणानंतर शिवकुमार यांनी असे सांगितले, जारकिहोळी विरोधात ज्याने कॉंग्रेसच्या नेत्याला भेटायला जात आहे असा दावा केला होता त्या महिलेबरोबर त्याने या संदर्भात उल्लेख केला होता.
“त्या बाईंनी मला भेटायचा प्रयत्न केला. ती कदाचित आली असती, पण आम्ही भेटलो नाही, असे शिवकुमार म्हणाले. “आम्ही सार्वजनिक जीवनात वावरत असतो. राजकारणी म्हणून, आम्ही आमच्याकडे आलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे बरेच लोक घरी किंवा माझ्या कार्यालयात अडचणी घेऊन येत असल्याचे पाहू शकता, असे म्हणाले.
या आरोपाची सत्यता अद्याप पडताळणी झालेली नाही. ऑडिओ संभाषणानंतर लगेचच भाजपने शिवकुमारच्या राजीनाम्याची मागणी केली. याबद्दल शिवकुमार यांना विचारले असता ते हसले. शिवकुमार म्हणाले की, लैंगिक घोटाळ्यातील आरोपींपैकी नरेश गौडा माझ्या ओळखीचा आहे. मी त्याच्या घरी बर्याच वेळा भेट दिली आहे. पण माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.