प्रतिनिधी/ बेळगाव
झी कन्नड या वाहिनीवर सध्या महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका दाखविली जात आहे. या मालिकेच्या बॅनरवर बेळगाव तसेच मंडय़ा येथे काही समाजकंटकांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर क्रांती युवा संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
या मालिकेच्या लावण्यात आलेल्या बॅनरवर अथणी तालुक्मयातील यल्लडगी व मंडय़ा जिल्हय़ातील मटूर तालुक्मयात दगडफेक करण्याचा प्रयत्न केला गेला. हे प्रकार अत्यंत निंदनीय असून, अशा माथेफिरूंना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बेळगाव जिल्हा सेपेटरी साईनाथ जंटीनकट्टी, रवि दोडमनी, मयूर मल्लूरकर, संतोष पात्रोट, सुनील दंडगल, सतीश खानापुरे, प्रभू दंडगल, अरुण गुंजीकर, रोहित भोसले यासह इतर उपस्थित होते.