ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उक्कड जवळ एका अनोळखीचा मृतदेह आढळून आला होता. त्याची अद्याप ओळख पटली नसून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उक्कडजवळ सुमारे 60 ते 65 वषीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला होता. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली होती. कंग्राळी बी.के. येथील बसवराज डुमनाईक यांनी फिर्याद दिली होती.
5 फुट उंची, गहू वर्ण, अंगाने सडपातळ असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर काळे-पांढरे टिशर्ट परिधान केला होता. वरील वर्णनाच्या वृध्दा विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन काकती पोलिसांनी केले आहे.