प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर येथे झाडशहापूरला जोडल्या गेलेल्या मुगुळ ओढय़ामध्ये रेल्वे रस्त्याच्या बाजूला तरुणाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. येळ्ळूरच्या शिवारामध्ये गुडघाभर पाण्यामध्ये हा मृतदेह सापडला आहे.
दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटली असून, प्रज्ज्वल बसवराज महांतशेट्टी (वय 24, रा. हिंदवाडी बेळगाव)असे त्याचे नाव आहे. प्रज्ज्वल हा डॉ. बसवराज महांतशेट्टी यांचा मुलगा आहे. मागील काही वर्षांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याचे आई-वडील परगावी गेले असताना तो बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. याची फ्ढिर्याद दि. 10 रोजी टिळकवाडी पोलिस स्थानकात पालकांनी †िदली होती.
त्याचा मृतदेह येळ्ळूर-झाडशहापूर शिवाराला जोडणाऱया मुगळ या ओढय़ामध्ये आढळला. ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर व पोलिस उपनिरीक्षक आनंद आदगोंडा घटनास्थळी दाखल झाले. तपासाअंती प्रज्ज्वल याचा तो मृतदेह असल्याचे आढळून आले आहे. मृतदेहावर कोणताही घाव नव्हता. त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.