विद्यार्थ्यांची अवस्था ना घर का ना घाट का
राजस्थान येथील कोटामधून गेल्या जूनपासून नीट कोचिंग परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले होते. त्यामुळे कोटा येथील जिल्हाधिकाऱयांची परवानगी घेऊन ते खासगी बसने कर्नाटकाकडे रवाना झाले. व गुरुवारी अखेर ते बेळगावला पोहोचले. तत्पूर्वी बसमध्ये बसण्यापूर्वी कोटा येथे त्यांची कोविड तपासणी करण्यात आली होती व ती निगेटिव्हही आली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची दुसऱया दिवशीही तपासणी करण्यात आली. पण जेव्हा ते सर्व विद्यार्थी गुरुवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता बेळगावला पोहोचले तेव्हा त्यांना थेट हॉटेल क्वॉरंटाईन करण्यात आले.
त्या विद्यार्थ्यांना आधी सांगण्यात आले होते की तुमची तपासणी करून तुम्हाला होम क्वॉरंटाईन करू पण अशा धोकादायक परिस्थितीत त्यांना सिव्हिलमध्ये नेण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची कोरोना तपासणी करण्याऐवजी त्यांची विचारपूस करून त्यांची सर्व माहिती घेण्यात आली व त्यांचे थर्मल स्क्रीनिंगद्वारे टेंपरेचर तपासण्यात आले व त्यांना पेपरवर ‘अप्रू फ्रॉम होम’ असा शिक्का मारून पुन्हा हॉटेलमध्ये क्वॉरंटाईनसाठी पाठविण्यात आले.
होम क्वॉरंटाईन सांगून अशाप्रकारे हॉटेल क्वॉरंटाईन केल्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या हातावर जो क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात आलेला आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांच्या हातावरची त्वचा काळपट झाली असून जळल्यासारखी वाटत असल्याचे येथील एका विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच त्यांना जे खाण्यासाठी अन्न दिले जाते ते हे निकृष्ट दर्जाचे असून यामुळे या विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे.
या विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्याची ऐवजी फक्त थर्मल स्क्रीनिंगद्वारे टेंपरेचर तपासण्यात येत आहे. राजस्थानमधील कोटावरून बेळगावमध्ये या विद्यार्थ्यांना येऊन चार ते पाच दिवस झाले तरी अद्याप यांची कोरोना तपासणी झालेलीच नाही. त्यामुळे आधी आमचे स्वॅब तपासा व आम्हाला घरी पाठवा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी तरुण भारतशी बोलताना केली आहे.