कंग्राळी खुर्द ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कंग्राळी खुर्द येथील कन्नड शाळेच्या मागे असलेल्या गल्लीला ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. सदर शाळेची जागा ही गावठाण जागा होती. मात्र आता तेथून त्या गल्लीला ये-जा करण्यासाठी जागा दिली जात नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. त्या गल्लीला जाण्यासाठी किमान 15 फुट रुंदीची जागा द्यावी, अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कन्नड शाळेला देण्यात आलेली ती जागा गावठाणमधील होती. एक शेतकरी कसत असताना त्याने त्या जागेसाठी अर्ज केला नसल्याने ती जागा गावठाण म्हणूनच ग्राम पंचायतला मिळाली. मात्र आता त्या जागेमधून जाण्यास आम्हाला रस्ता दिला जात नाही. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला ये-जा करण्यास रस्ता द्यावा, अशी मागणी केली आहे.
गल्लीला ये-जा करण्यास किमान 15 फुट तरी रस्ता द्या, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, प्रशांत पाटील, चेतक कांबळे, मधुमती पाटील, वीणा पुजारी, शिवाजी पाटील, परशराम बुवा, सुरेश पाटील, जोतिबा पाटील, महेश मजुकर, सुमन पाटील, बाळू पाटील, परशराम पाटील, शितल चौगुले, प्रभा पाटील, स्वाती बुवा, यल्लु पाटील, चंद्रु पाटील यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.