चिपळूण
नोकरी तसेच दुप्पट पैशाचे आमिष दाखवून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱया खेर्डी येथील मार्केटिंग कंपनीच्या संचालकास पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी त्यांनी पोलीस कोठडी संपताच त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संजय चव्हाण (खेर्डी) असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. चव्हाण याने शहरालगतच्या खेर्डी येथे श्री स्वामी समर्थ असोसिएशनच्या माध्यमातून नोकरी, नंतर मल्टीपर्पज चेन आणि ऑनलाईन आयडी अशा नवनवीन योजना आणून दुप्पट पैशाचे आमिष दाखवले होते. त्यानुसार यात ग्राहकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्याने ग्राहकांची जवळपास 40 लाखापर्यंत फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला होता. पोलिसांनी याप्रकरणी चव्हाण याला मोठय़ा शिताफीने अटक केली होती. सोमवारी त्याची पोलीस कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.