कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
कमकारट्टी (ता. बेळगाव) येथे अंदर-बाहर जुगार खेळणाऱया 11 जुगाऱयांना गुरुवारी हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकुन 11 जणांना अटक केली होती. त्यांच्या जवळून 1 लाख 67 हजार 630 रुपये जप्त करण्यात आले होते.
आनंद दोड्डकल्लण्णावर (वय 27, रा. हलगा), तौसीफ उस्ताद (वय 25, रा. कित्तूर), शंकर वड्डर (वय 36, रा. कित्तूर), मंगेश मरगण्णाचे (वय 33, रा. हलगा), विवेक केसरकर (वय 27, रा. रामनगर, बेळगाव), राकेश पाटील (वय 29, रा. भोज गल्ली, शहापूर), परशराम बिर्जे (वय 23, रा. तेग्गीन गल्ली-वडगाव), नितीन ताशिलदार (वय 40, रा. गांधीनगर), सागर पाटील (वय 28, रा. सराफ गल्ली-वडगाव), शशिकांत गुरव (वय 27, रा. रामतीर्थनगर), सचिन चंद्रसेन (वय 31, रा. शहापूर) अशी त्यांची नावे आहेत.