ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी माहितीनुसार, त्रिपुरामध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजून 48 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्रिपुरा पासून 63 किलोमीटर लांब असलेल्या उत्तर पूर्व धर्मनगरमध्ये भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टल स्केल एवढी होती.
याआधी मागच्या आठवड्यात रविवारी पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हे धक्के आसाम मधील गुवाहाटी, मेघालय, मणिपूर आणि मिझोराममध्ये कमी तीव्रतेचा भूकंप झाला होता.