अगरतळा / वृत्तसंस्था
त्रिपुराचे 19 वे राज्यपाल म्हणून सत्यदेव नारायण आर्य यांनी बुधवारी शपथग्रहण केले आहे. त्यांनी आता रमेश बैस यांचे स्थान घेतले आहे. त्यांना त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. यापूर्वी ते हरियाणाचे राज्यपाल होते. शपथविधी कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लव कुमार देव, त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व वरीष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनात राज्य चहुमुखी विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देव यांनी व्यक्त केली.