आज रंगणार 14 घोडय़ांचा नृत्याविष्कार
प्रतिनिधी /वाळपई
नृत्य परंपरेचा अविष्कार म्हणून गोवा राज्याबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांत वैशिष्टय़पूर्ण समजल्या जाणाऱया ठाणे सत्तरी येथील सात भावांचा त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सव म्हणजे गावासाठी भूषणावह बाब आहे. यात हजारो नागरिक, भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होत असतात. यंदा हा पारंपरिक लोक प्रकार मंगळवारी दि. 22 मार्च रोजी येथील सुप्रसिद्ध कोळगिरो व मंडळगिरो या विस्तीर्ण मैदानावर साजरा होणार आहे.
शनिवारी 22 मार्च रोजी सकाळपासून या परंपरागत उत्सवाला सुरुवात होणार आहे. सकाळी धार्मिक उपक्रम व दुसऱया सत्रात साडेचार वाजता घोडय़ांची तयारी सुरू होणार आहे. सर्वप्रथम ठाणे गावातील चार घोडे तयार होऊन देवाचा आशीर्वाद घेतात व आपल्या नृत्याविष्काराला सुरुवात करतात. त्यानंतर पाल सत्तरी येतील घोडय़ांचे आगमन होते. अशाच प्रकारे चरावणे, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक, गोळावली, रिवे आदिना मानसन्मानाने देवाच्या दर्शनासाठी आणण्यात येते. तद्नंतर 14 घोडे एकत्र येऊन नृत्य अविष्कारला प्रारंभ होतो.
रात्री बारा ते एक पर्यंत नृत्य आविष्कार चालूच असतो. मध्यंतरी भाविकांचे नवस फेडणे. गाऱयाणे घालणे आधीसारखे पार पाडण्यात येतात. पहाटे सदर 14 घोडे देवळापाशी होळीकडे जाऊन नृत्याविष्कार करतात व धार्मिक परंपरा व प्रक्रिया पूर्ण करून मांसाहारी भोजनानंतर उत्साहाची समाप्ती होईल.
गेल्या काही वर्षापासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू असून यासाठी सात गावातील बांधवाची एकजूट महत्वपूर्ण आहे, असे पाली सत्तरी येतील ज्ये÷ नागरिक बुधाजी गावकर सांगितले. गोवा महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात घोडेमोडणी उत्सव चांगलाच प्रसिद्ध असल्याचे चरावणे सत्तरी येथील नारायण गावस यांनी सांगितले. अशा पारंपारिक सोहळय़ाने सात गावांना वेगवेगळय़ा प्रकारची ओळख निर्माण करून दिली आहे यामुळे हा पारंपरिक सोहळा तीन वर्षांनी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यासाठी तरुण पिढीने सहकार्य करण्याचे आवाहन रिवे येथील ग्रामस्थ महादेव गांवकर यांनी केले.