अनेक जणी सतत थकवा येत असल्याची तक्रार करत असतात. काही वेळा थोडं काम केल्यानंतर गळून गेल्यासारखं वाटतं. काम कितीही आवडीचं असलं तरी अतिथकव्यामुळे अनेकदा उत्साह वाटत नाही. थकव्यामुळे ऑफिसमधल्या महत्वाच्या जबाबदारीपासून लांब रहावं लागतं आणि प्रगतीपासून तुम्ही चार हात लांब राहता. थकवा घालवण्यासाठी सततच्या चहा किंवा कॉफीच्या सेवनामुळे तात्पुरता उत्साह वाटत असला तरी त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. सतत येणारा थकवा दूर करण्यासाठी करून पहा काही उपाय…..
- सुक्या मेव्याच्या सेवनामुळे ताकद टिकून राहण्यास मदत होते. खुप थकवा आला असेल तर थोडय़ाशा सुक्या मेव्यानेही उत्साही वाटू लागेल.
- केळं हे उर्जेचा स्त्रोत आहे. त्यात कर्बोदकं, नैसर्गिक गोडवा, ऍमिनो ऍसिड, जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असल्याने त्वरित उर्जा देणारं खाद्य म्हणूनही केळ्याकडे पाहता येतं.
- रोजच्या नाश्त्यामधे अंडय़ाचा समावेश असेल तर तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. अंडं हे प्रथिनं आणि अमिनो ऍसिड यांचा समृध्द स्त्रोत असल्यानं थकवा पळून जातो.
- ऍव्हाकॅडो या फळामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते त्यामुळेच हे फळ सुपरफूड श्रेणीमध्ये मोडतं. या फळामध्ये फायबरचं प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर असल्याने पचनसंस्था सुदृढ होण्यास मदत होते.