खासदार संजयकाका पाटील यांच्या साखर कारखान्या विरोधात आंदोलन
प्रतिनिधी / सांगली :
थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी बनियन मोर्चा काढला. विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्ते चड्डी-बनियान घालून या मोर्चात सहभागी झाले होते.
खा. संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची ऊस बिले गेल्या आठ महिन्यापासून थकीत आहेत. ती मिळावीत आणि आर आर सी ची कारवाई तातडीने व्हावी या प्रमुख मागणीसाठी चड्डी बनियन मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.