ऑस्कर पुरस्काराचे वितरण : ‘कोडा’ ठरला सर्वोत्तम चित्रपट : युक्रेनला मदत करण्याचे सोहळय़ादरम्यात आवाहन
वृत्तसंस्था / लॉस एंजिलिस
त94 व्या अकॅडमी अवॉर्डचे रविवारी 27 मार्च रोजी (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार) वितरण झाले असून यात कोडा हा सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. या पुरस्कार सोहळय़ाला एका घटनेमुळे मात्र गालबोट लागले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकाविणाऱया विल स्मिथने ऑस्कर सोहळय़ातील व्यासपीठावर कॉमेडियन अन् सूत्रसंचालक क्रिस रॉक यांना थप्पड लगावल्याने उपस्थित लोकांना धक्का बसला आहे. तर सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘द समर ऑफ सोल’ला मिळाला आहे. ऑस्कर सोहळय़ात युक्रेनला शक्य होईल तितकी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय चित्रपट ‘रायटिंग विथ फायर’ पुरस्कार जिंकण्यास अपयशी ठरला. रायटिंग विथ फायरचे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘कोडा’ला प्राप्त झाला आहे. कोडाच्या सर्व कलाकारांना ऑस्कर सोहळय़ात स्टँडिंग ओवेशन देण्यात आले. या चित्रपटाच्या कहाणीत परिवारातील चार लोक असून यातील 3 जणांना श्रवणशक्ती नसल्याचे दाखविण्यात आले आहे. तर चौथा व्यक्ती गायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहत असल्याचे चित्रित करण्यात आले आहे.
‘द आईज ऑफ टॅम्मी फाए’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘किंग रिचर्ड’साठी विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. हा चित्रपट अमेरिकन टेनिस प्रशिक्षक रिचर्ड्स विलियम्स यांचा बायोपिक आहे. तसेच ‘द पॉवर ऑफ डॉग’ चित्रपटासाठी जॅन कँपियन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. कोडा’ चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ट्रॉय कोटसर यांना मिळाला आहे. 53 वर्षीय कोटसर यांचा हा पहिला ऑस्कर आहे.
‘आर्मी ऑफ द डेड’ला पुरस्कार
हुमा कुरेशी असलेला चित्रपट ‘आर्मी ऑफ द डेड’ला फॅन्स चॉइस पुरस्कार मिळाला आहे. बेलफास्ट चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट पटकथाचा पुरस्कार केनेथ ब्रनाघ यांना देण्यात आला. लाइव्ह ऍक्शन शॉर्टफिल्मचा अकॅडमी पुरस्कार ‘द लाँग गुडबाय’ला प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइनचा ऑस्कर ‘क्रूएला3़ चित्रपटासाठी जेन्नी बीवन यांनी पटकाविला आहे.
ऑस्कर विजेत्यांची यादी
श्रेणी विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट कोडा
सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टेन
सर्वोत्कृष्ट मूळ गीत नो टाईम टू डाय
सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट एनकँटो
लाइव्ह ऍक्शन लघूपट द लाँग गूड
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ड्राइव्ह माय कार
सर्वोत्कृष्ट पटकथा केनेथ ब्रनाघ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ट्रॉय कोटसर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जेन कँपियन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एरिना डेबोस
सर्वोत्कृष्ट माहितीपट समर ऑफ सोल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ग्रेग प्रेसर
सर्वोत्कृष्ट एडिटिंग जो वॉकर
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर डय़ून
ड्राइव्ह माय कार
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर जपानच्या ‘ड्राइव्ह माय कार’ला मिळाला. तर डय़ून चित्रपटाला आतापर्यंत 6 ऑस्कर मिळाले आहेत. यात सर्वोत्कृष्ट एडिटिंग, सर्वोत्कृष्ट पटकथा, प्रॉडक्शन डिझाइन, ध्वनियंत्रणा, व्हिज्युअल इफेक्ट आणि ग्रेग प्रेसर यांना सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्रॉफचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रेम मूर्ख वाटणारी कृत्यं करविते!
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारल्यावर अभिनेता विल स्मिथने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना स्मिथ यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी सूत्रसंचालक क्रिस रॉक यांना थप्पड लगावल्याप्रकरणी सर्वांची माफी मागितली आहे. तसेच प्रेम वेडी वाटतील अशी कृत्ये करवित असल्याचे म्हणत अकॅडमीची माफी मागितली आहे. ऑस्कर सोहळय़ादरम्यान क्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथसंबंधी विनोद केला होता, ज्यानंतर विल यांनी व्यासपीठावर जात क्रिसला थप्पड लगावली होती. माझ्या पत्नीचे नाव कधीच स्वतःच्या तोंडावर आणू नको असे विलने रॉकला बजावले होते. रॉकने विलची पत्नी अभिनेत्री-गायिका जाडा हिच्या टक्कलाबद्दल थट्टा केली होती.