ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात 31 डिसेंबरपूर्वी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर 27 डिसेंबरला विदर्भात तुरळक आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पाऊस बरसला होता. ऐन थंडीत पडलेल्या पावसाने शेतमालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा डिसेंबरअखेर पाऊस बरसणार आहे. त्यामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार आहे.