ऑनलाईन टीम/तरुण भारत
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र करण्यासाठी आसाम पोलीस कर्मचार्यांसह गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरले होते. शर्मा यांनी नवीन वर्षाची संध्याकाळ ही गुवाहाटीच्या रस्त्यांवर मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालत घालवली. आसाममध्ये मद्यपान करून वाहन चालवल्याने होणारे मृत्यू होऊ नयेत या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहनांची तपासणी करताना मुख्यमंत्री वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसोबत दिसले. मुख्यमंत्र्यांचे तपासणीदरम्याचने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते पोलीस कर्मचार्यांसोबत उभा राहून वाहनांची तपासणी करत आहेत.