बेळगाव कधीही न थांबणारे शहर कोरोनामुळे मात्र थांबले! वाहतूक ठप्प… कोठेही वाहतुकीची कोंडी नाही… ना लोकांचा गोंगाट….ना बाजारात गर्दी… मैदान-उद्यानांमध्ये लोक नाहीत…. अशी सध्या बेळगावची स्थिती झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि खबरदारी म्हणून दररोज धावणारे शहर आठवडाभरापासून थांबले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याऐsवजी सध्याला सर्वांनी घरी राहण्याची खरी गरज आहे. प्रत्येक बेळगावकर या लढाईत सहभागी झाला असून कोरोनाला पराभूत करणारच ही इच्छाशक्ती बाळगून आहे. मी सुरक्षित तर देश सुरक्षित याचा अवलंब तंतोतंत करण्यासाठी व्यावसायिक पुढे येत आहेत. सुन्यासुन्या रस्त्यांसहची थांबलेल्या शहराची बोलकी छायाचित्रे.
Previous Articleपोलिसांची 24 तास ऑन डय़ुटी
Next Article जिह्यात होम क्वारंटाईनची संख्या वाढतीच!