कमी वयात मोठी झेप
फ्रॉम द इनसाइड-द इनर सोल ऑफ ए यंग पोएट पुस्तक
अमेरिकेच्या ऍरिझोनामध्ये राहणाऱया 10 वर्षीय थानवीचे कवितांवर आधारित एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. 5 वीत शिकणारी थानवी स्वतःच्या पालकांसह ऍरिझोनात वास्तव्याला आहे. तिचे वडिल महेंद्र हे इंटेल कंपनीत हार्डवेअर इंजिनियर आहेत. तर आई दीपिका सॉफ्टवेअर इंजिजिनयर आहे. थानवीच्या पुस्तकाचे नाव ‘फ्रॉम द इनसाइड-द इनर सोल ऑफ ए यंग पोएट’ आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर ती अमेरिकेतील सर्वात कमी वयाची लेखिका ठरली आहे. तिच्या पुस्तकाला अमेझॉने 5 पैकी 4.9 मानांकन दिले आहे.
थानवीने स्वतःच्या पुस्तकात स्वकीयांना गमाविल्यावर येणारा राग, दुःख, एकटेपणा आणि नैराश्य मांडले आहे. स्वतःच्या पुस्तकाच्या माध्यमातून थानवीने निसर्गाबद्दलचे प्रेमही दर्शविले आहे. तसेच आनंद आणि नातेसंबंधही व्यक्त केले आहेत. थानवीला हॅरी पॉटर सीरिज वाचणे आवडते. लिखाणाबद्दलच्या औत्सुक्यामुळेच लेखिका झाल्याचे ती सांगते.