थायरॉईडशी संबंधित अनेक समस्या आहेत. या ग्रंथीच्या असंतुलनामुळे वजन वाढणं, केस गळणं, चेहर्यावर मुरूमं येणं यांसारख्या समस्या निर्माण होतात. केस गळणं हे थायरॉइडचं प्रमुख लक्षण मानलं जातं. थायरॉईडवर औषधोपचार आहेतच शिवाय जीवनशैलीत बदल करून तुम्ही या समस्येवर मात करू शकता.
- थायरॉईड ग्रंथींचं कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. बीन्स, मासे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा हे घटक लोहाचा प्रमुख स्रोत आहेत. लोहाची कमतरता भरून निघाल्यास केसांचं गळणं कमी होऊ लागतं.
- एसेंशियल ऑईलचा वापर करून थायरॉईडमुळे उद्भवलेली केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते. रोझमेरी, कॅमोमाईल,लवेंडर अशी एसेंशियल ऑईल्स केसांसाठी खूपच उपयुक्त आहेत. ही तेलं खोबरेल तेल किंवा ऑईल ऑईलमध्ये मिसळून केसांना लावा.
- सातत्याने तळकट, तिखट आणि जंक फूड खाल्ल्याने थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच पोषक आहार घेतल्याने थायरॉइड ग्रंथींचं संतुलन साधता येईल. यामुळे केसांनाही आवश्यक ते पोषक घटक मिळतील. यासाठी आलं, हळद, कढीपत्ता अशा घटकांचा आहारात समावेश करा.
- काही हर्ब्सच्या समावेशामुळे थायरॉईडमुळे निर्माण झालेली केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. तुम्ही सॉ पाल्मेटो, लाल लवंग, ब्लॅक कोहोश अशा हर्ब्सचा आहारात समावेश करू शकता. यासोबतच दालचिनी, सिलेंट्रोसारख्या हर्ब्सचाही वापर करायला हवा.
- योगासनं, ध्यानधारणा, नियमित व्यायामाने थायरॉईडवर नियंत्रण मिळवता येतं. ताणतणावांमुळे थायरॉईड उद्भवू शकतो. योगामुळे ताणाला नियंत्रणात ठेवणं शक्य होतं. सर्वांगिण आरोग्य उत्तम होतं. परिणामी केसांची वाढही होऊ लागते.