वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पुरूष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला दुखापतीमुळे थायलंडमध्ये होणाऱया विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर सुपर 1000 दोन बॅडमिंटन स्पर्धांना मुकावे लागत आहे. या दोन स्पर्धांसाठी रविवारी भारतीय बॅडमिंटन संघाने थायलंडला प्रयाण केले आहे.
19 वर्षीय लक्ष्य सेनला काही दिवसापूर्वी बॅडमिंटनचा सराव करीत असताना दुखापत झाली होती. सदर दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याने थायलंडमधील स्पर्धेसाठी आपण उपलब्ध होवू शकणार नाही, असे भारतीय बॅडमिंटन फेडरेशनला कळविले. 2019 च्या बॅडमिंटन हंगामात लक्ष्य सेनने वरिष्ठांच्या विभागात पाच स्पर्धांमध्ये एकेरीची अजिंक्यपदे मिळविली लक्ष्य सेनला आणखी काही दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.